कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी घेतला उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा आढावा
खासदार श्रीरंग आप्पा बारणेंसह जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील होते उपस्थित
पनवेल : राज भंडारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा आढावा खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणेंसह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी घेतला. यावेळी येथील कोरोना रुग्णांवर होणारे उपचार, त्यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधा आदी बाबींसह औषध साठा, इंजेक्शन्स आदी बाबी जाणून घेतल्या.
राज्यात महा विकास आघाडी सरकार आहे त्यातच मुख्यमंत्री स्वतः शिवसेनेचे प्रमुख आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून पनवेलमधील रुग्णालयात काही सुविधांचा अभाव वाटत असेल तर ते तत्काळ उभ करण्याचे धाडस शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे येथील रुग्णांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू न देण्यासाठी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे आणि जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.लोहारे यांची भेट घेवून रुग्णालय परिसराचा आढावा घेतला.
यावेळी रूग्णालयातील कोरोना वार्ड व इतर पेशंटची सविस्तर माहिती घेतली. वैद्यकीय अधिक्षक डॅा. बसवराज लोहारे, डॉ. बालाजी फाळके, डॉ. अरुण पोहरे, सुभाष जाधव, ज्योती गुरव, शिवसेना पनवेल शहर संघटक प्रविण जाधव, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे उपस्थित होते. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात २०० बेड आहेत. या रुग्णालयात कोरोना रुग्णांसह इतर रुग्णावर देखील उपचार केले जातात. व्हेंटिलेटर, आयसीयू, ऑक्सिजनची कमतरता भासू नये, रूग्णांना चांगली सेवा दिली जावी आदी सूचना त्यांनी दिल्या.