पनवेल

खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन समोरील पान टपरीतून विदेशी सिगारेटचा साठा हस्तगत

पनवेल,  (संजय कदम)

खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन समोरील पान टपरीमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेटची विक्री बेकायदेशीररित्या करण्यात येत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळताच त्यांनी कामोठे पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सिगारेटचा साठा हस्तगत केला आहे.
खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन समोरील जिवेश पानटपरीवर विदेशी सिगारेटची पाकिटे विक्रीसाठी ठेवण्यात येत असून सदर सिगारेटच्या पाकीटावर शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे योग्य आकाराचे वैधानिक चित्र व वैधानिक इशारा नसतो. तसेच त्यांनी केंद्र शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थ अधिनियमाचा भंग केल्याने त्या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वपोनि जयराज छापरिया यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून अजय सिंग (23) याला ताब्यात घेवून त्या ठिकाणावरुन जवळपास 6 हजाराच्या किंमतीची सिगारेटची पाकिटे हस्तगत करण्यात आली आहेत.खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन समोरील पान टपरीतून विदेशी सिगारेटचा साठा हस्तगत

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.