पनवेल

ऑनलाईन करण्यात आली 1 लाख 30 हजाराची फसवणूक

ऑनलाईन करण्यात आली 1 लाख 30 हजाराची फसवणूक

पनवेल, (संजय कदम)

फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या तसेच पत्नीच्या मोबाईल फोनवर अनोळखी इसमाने संपर्क साधून ते सीआरईडी या अ‍ॅप्लिकेशनचा कस्टमर एक्झिक्युटीव्ह बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करून या अ‍ॅप्लिकेशनमधील इश्श्यु सॉल करण्यासाठी त्यांना त्यांच्या मोबाईलवर दुसरेे अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगून त्याचा पासवर्ड व कोड नंबर घेेवून फिर्यादीच्या क्रेडीट कार्डमधील माहिती घेवून व त्याचा वापर करून जवळपास 1 लाख 29 हजार 984 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

किशोर गवळी (42 रा.कामोठे) यांना तसेच त्यांच्या पत्नीला त्यांच्या मोबाईल फोनवर एका अनोळखी इसमाने फोन करून सीआरईडी या अ‍ॅप्लिकेशनचा कस्टमर एक्झिक्युटीव्ह बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करून या अ‍ॅप्लिकेशनमधील इश्श्यु सॉल करण्यासाठी त्यांना त्यांच्या मोबाईलवर दुसरेे अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगून त्याचा पासवर्ड व कोड नंबर घेेवून फिर्यादीच्या क्रेडीट कार्डमधील माहिती घेवून व त्याचा वापर करून जवळपास 1 लाख 29 हजार 984 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.