पनवेल

पोलिसांनी केली गावठी दारु हस्तगत

पनवेल,  (वार्ताहर)

तालुक्यातील भंगारपाडा परिसरातून गुन्हे शाखा कक्ष 2 व पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने गावठी दारुचा साठा हस्तगत केला आहे.
या ठिकाणी एका घराच्या पाठीमागे हातभट्टीची दारु, कॅन, व इतर साहित्य ठेवण्यात येवून त्याची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल व पनवेल शहर पोलिसांना मिळताच त्यांच्या विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा मारुन जवळपास 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.