ताज्या

३१ मे रोजी एमजेपीचे १४ तास शटडाऊन

पनवेल : राज भंडारी 
न्हावा शेवा पाणी पुरवठा योजने अंतर्गत भिंगार ते कुंडेवहाळ दरम्यान तातडीची देखभाल व योजनेतील बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेल्या गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ३१ मे रोजी सकाळी आठ ते सायंकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण चौदा तास शटडाऊन घेण्यात येणार आहे.  त्यामुळे शट डाऊन कालावधीच्या आधी जास्तीत जास्त पाणी टाक्यांमधून साठवून शटडाऊन कालावधीमध्ये पाण्याची काटकसर करावी तसेच दुसऱ्या दिवशी कमी प्रमाणात व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कळवले आहे.
Share This

Leave a Reply

Your email address will not be published.