पनवेल

ओरियन मॉल परिसरात आढळला मृतदेह

पनवेल / वार्ताहर
शहरातील ओरियन मॉल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
          सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे, उंची सहा फूट, रंग गोरा, चेहरा उभट, बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे व वाढलेले, दाढी काळी व वाढलेली असून अंगात निळसर रंगाचा टीशर्ट व मेंहदी रंगाची ट्रॅक पॅंट व त्यावर लाल व काळी पट्टी आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-०२२२७४५२३३ किंवा पोना आर.ए. घाडगे यांच्याशी संपर्क साधावा.
Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *