पनवेल

सिडकोचे अधिकारी जागेवर नसल्याने शेकापचे पनवेल महापालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोच्या सहाय्यक अभियंत्याच्या दरवाजाला चिकटवले निवेदन

पनवेल / प्रतिनिधी 

खांदा कॉलनी मधील अनियमित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा बाबत तसेच तीस वर्षापासूनची जुनी झालेली पाईप लाईन लवकरात लवकर बदलावी व वाढीवर टाक्या बांधून खांदा कॉलनीतील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवावी याबाबत शेतकरी कामगार पक्ष्याने आक्रमक भूमिका घेतली सिडको कार्यालय नवीन पनवेल येथे निवेदन देण्यासाठी शेकापचे शिष्टमंडळ गेले होते
खांदा कॉलनी शहरातील पाणी समस्या अत्यंत गंभीर होत चालली आहे अनेक सोसायट्यांमध्ये दहा दिवसांपासून पाणी येत नाही तसेच बऱ्याच सोसायट्यांना कमी दाबाने पाणी येत आहे त्यामुळे सोसायटी धारकांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहे शेकापने काही सोसायट्यांना टँकर पुरवले आहेत पाणी प्रश्नाबाबत सिडकोकडून तात्पुरती उपाययोजना केली जात आहे खांदा कॉलनीतील सेक्टर ६ व ११ या ठिकाणी सिडकोची पाणी साठवणूक टाक्या आहेत त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे तरी सिडकोकडून वाढीव टाक्‍या बांधाव्यात तसेच खांदा कॉलनीतील तीस ते चाळीस वर्षापासूनची जुनी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन लवकरात लवकर बदलावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे गेल्या आठ दिवसापासून पाणी प्रश्नाबाबत खांदा कॉलनीतील नागरिक अतिशय त्रासलेले आहेत याबाबत ठोस भूमिका घेऊन खांदा कॉलनीतील नागरिकांची कायमस्वरूपी पाण्याची समस्या सोडवावी यासाठी शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांचे शिष्टमंडळ सिडको नविन पनवेल कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता सोबत माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, सागर भडांगे, अनिल बंडगर,ऍड किरण घरत, योगेश कोठेकर, महेंद्र कांबळे ,राजेश कांबळे, नलिनी जाधव ,भारती मोहिते, किशोर पाटील पदाधिकारी उपस्थित होते

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.