पनवेल

आ. निलेश लंके यांची टाटा ‘मेमोरियल’ हॉस्पिटलमध्ये  भेट मूळ पारनेर तालुक्यातील कर्करोगग्रस्त रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस

पनवेल / प्रतिनिधी 
खारघर येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये सुद्धा कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातात. मूळ पारनेर तालुक्यातील उपचारार्थ दाखल झालेल्या एका ज्येष्ठ महिला रुग्णाच्या प्रकृतीची  चौकशी करण्यासाठी मंगळवारी आमदार निलेश लंके यांनी संबंधित रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी येथे रुग्णसेवा बजावत असलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांशी संवाद साधला. त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे अनुभवातून मार्गदर्शन केले.आ.लंके यांच्यासारखा लोकप्रिय लोकप्रतिनिधीला भेटता आले म्हणून येथे काम करणाऱ्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेले काम जगजाहीर आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो आ.लंके यांच्या सारखाच असावा अशा प्रकारचा हट्टाहास महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात धरला जात आहे. लोकांच्या सेवेमध्ये कायम गर्क असणाऱ्या आमदार निलेश लंके हे नाव लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहे. त्यामुळे ते ज्या ठिकाणी जातील तेथे त्यांना पाहण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद करण्याबरोबर सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी अनेक जण पुढे येतात. तो मोह कुणालाच आवरता येत नाही. याचा प्रत्यय मंगळवारी खारघर येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रात्री नऊ वाजता आला. पारनेर नगरचे आमदार पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आपल्या मूळ गावी जात असताना तालुक्यातील एका उपचारार्थ दाखल झालेल्या महिला रुग्णांची भेट घेण्यासाठी खारघर येथील टाटा रुग्णालयात आले. त्यांनी संबंधित रुग्णाच्या प्रकृतीची विचारपूस आणि चौकशी केली. उपचार करत असलेले डॉक्टर आणि कुटुंबियांशी चर्चा केली. संबंधितांना धीर आणि आधार दिल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी कर्करुग्णांची सेवा करणारे डॉक्टर आणि परिचारिका यांच्याशी उस्फूर्तपणे संवाद साधला. आमदार महोदयांनी या सर्वांशी मनसोक्तपणे गप्पा मारल्या हास्य विनोद करीत त्यांना हसवले सुद्धा. वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये थकलेल्या या सर्व मंडळींना ताजेतवाने आणि टवटवीत करण्यामध्ये त्यांना यश आले. सर्वांच्या चेहऱ्यावर आमदार निलेश लंके यांनी आपल्या खास शैली मधून एक प्रकारे हस्य फुलवले. त्यानंतर पारनेर नगरच्या आमदारांसोबत संबंधित आणि सेल्फी आणि फोटो घेतले. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान चे मुंबई उपाध्यक्ष गोविंद साबळे, सचिव नितीन चिकणे, संपर्क प्रमुख भाऊ पावडे, दिलीप घुले, सचिन वाफारे, सचिन आंधळे, दादा दळवी, किरण जमदाडे उपस्थित होते. शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिराबाबत दिली  माहिती
 आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर नावाने कोविड सुरू केले आहे. या ठिकाणी ते देत असलेल्या रुग्णसेवेचे कीर्ती ही साता  समुद्र पार गेली आहे. त्यांच्या कार्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथील या आरोग्य केंद्रामध्ये कशा पद्धतीने रूग्णांना सेवा दिली जाते. त्यावरील उपचार पद्धती तसेच येथे योग अभ्यासाबरोबरच सायंकाळच्या सुमारास होणारे अध्यात्मिक, कला सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. आलेले अनुभव  केले शेअर कोविड सेंटरमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये आलेले काही निवडक अनुभव त्यांनी टाटा हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि परिचारिकांना शेअर केले. रात्रीच्या वेळी सफरचंद एका रुग्णाने मागितले असताना मध्यरात्री दुकानाचा टाळा तोडून त्याला ते फळ उपलब्ध कसे करून दिले याचे कथन त्यांनी केले.अंजीर मिळावे म्हणून थेट कार्यकर्त्यांना मुंबईला पाठवले पण ते रुग्णाला दिलेच हा किस्सा त्यांनी सांगितला. रुग्णांच्या बेडवर जाऊन बसून आपण आणि इतर कार्यकर्ते कसा धीर देतात याबाबतही ते भरभरून बोलले. रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासणे त्यांना कोणत्या गोळ्या द्यायच्या याची मला सर्व माहिती झालेली आहे. मी अर्धा डॉक्टरचा झालो असल्याचे सांगतात सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली. लोक प्रतिनिधित्वाचा आदर्श घालून दिल्याबद्दल डॉक्टर आणि परिचारिकांनी आमदार निलेश लंके यांचे कौतुक केले.
Share This

Leave a Reply

Your email address will not be published.