Uncategorised

माणसातला देव माणूस…

पनवेल / प्रतिनिधी 

मित्र आणि समाजातील गरजू लोकांना नेहमीच मदत करणारे त्यांच्या पाठीशी डोंगरा सारखे उभे राहणारे व्यक्तीमत्व म्हणजे दत्ताभाऊ पोखरकर. लॉकडाऊनचे   निर्बंध आणि दुसऱ्या लाटेत देशाची आणि महाराष्ट्राची झालेली भयानक परिस्थिती गोर-गरीब लोकांना बेरोजगारीचा बसलेला आर्थिक चटका व उपासमारी,लोकडाऊन  काळात  दत्ताभाऊ पोखरकर आणि त्यांच्या  टीम ने पनवेल,कर्जत,खोपोली,नवी मुंबई भागातील गोर गरीब,गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे कोवीड  हॉस्पिटल मध्ये रुग्णांना डब्बे पोहचवण्याचे काम केले.दत्ताभाऊ आणि  त्यांच्या टीम ने ऑक्सिजन बेड, प्लाझ्मा, इंजेक्शन आणि होम आयसोलेशन मध्ये असलेल्या कुटुंबांना जेवण आणि किराणा माल उपलब्ध करून देण्याचे काम केले. समाज अडचणीत असताना आणि त्यात काही जिवाभावाचे मित्र अडचणीत असताना दत्ताभाऊ पोखरकर आणि परिवार देवासारखा दत्ता भाऊ यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला.सख्खे आणि रक्ताची नाती जवळ नसताना दत्ताभाऊ पोखरकर सारखा देवदूत आपल्यासाठी धावून येतोय यामुळे आजारी व्यक्तींना धीर मिळतोय असे  अनुभवाचे बोल बोलणाऱ्या काहीं लोकांनी दत्ताभाऊ यांना विठ्ठल तर काहींनी श्रीकृष्ण सुदामाची उपाधी दिली. या सर्व गोष्टींची दखल घेत  दत्ताभाऊ पोखरकर यांचा राजे प्रतिष्ठान तर्फे कर्जत येथे सत्कार करण्यात आला.याप्रसंगी श्री.राहुल भाई महाजन,श्री.अविनाश पाटील,प्रथमेश भास्कर पुंडे,रोशन जंगम,सतीश हातमोडे,समाधान पाटील,संदेश काळभोर,प्रज्वल खैरनार, प्रमोद भोसले,भरत मोरे, हे उपस्थित होते.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *