पनवेल / विशाल सावंत
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी रायगड , नवीमुंबई , ठाणे, पालघर ह्या जिल्ह्यात वाद चांगलाच चिगळला आहे ह्यात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पहिल्या टप्यात सकाळी आंदोलन दुसऱ्या टप्यात सिडकोला घेराव आंदोलन आणि आता तिसऱ्या टप्यात मशाल मोर्चा काढण्यात आला क्रांतिदिनाचा अवचित साधून त्याच दिवशी मशाल मोर्चा जासई येथे आयोजित केला होता एक मोठी मशाल जसाच्या येथे लावण्यात आली आणि त्यातूनच छोट्या छोट्या मशाली पेटवून प्रत्येक गावात व शहरात पाठवण्यात आल्या त्यातील एक मशाल खांदा कॉलनी यथे पाठवण्यात आली खांदा कॉलोनी मधील कार्यसम्राट लोकप्रिय नगरसेविका सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथदादा गायकवाड , नगरसेवक मनोहर म्हात्रे , ओ बी सी सेल महिला मोर्चा आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते जो पर्यंत विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देत नाही तो पर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असे प्रतिपादन नगरसेविका सीताताई पाटील यांनी केले आहे