पनवेल राजकीय

चिंध्रण ग्रामपंचायतीच्या शिवसेनेचे उपसरपंच पदी शंकर देशेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी केले अभिनंदन

पनवेल / वार्ताहर

युवासेना वावंजे विभाग चिटनीस शंकर चाहू देशेकर ह्यांची चिंध्रण ग्रामपंचायती उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, विभाग प्रमुख दत्ता फडके, युवसेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, खारघर शहर अधिकारी विनोद पाटील शाखा प्रमुख वैभव दळवी, हरेश पाटील, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.