पनवेल राजकीय

महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा शिवसेना महिला आघाडीने केला निषेध

पनवेल/वार्ताहर

मुंबई च्या प्रथम नागरिक, महापौर, तसेच रायगड जिल्हा महिला संपर्क संघटिका सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारे जे बेताल वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा निषेध नवीन पनवेल शिवसेना महिला आघाडीतर्फे करण्यात आला आहे.
या संदर्भात निषेध करून खांदेश्‍वर पोलिसांनी त्वरित योग्य ती कारवाई करण्यासाठी, नवीन पनवेल महिला शहर संघटिका सौ.अपूर्वा प्रभू यांनी पनवेल महिला आघाडीच्या वतीने खांदेश्‍वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार नोंदवली. यावेळी तालुका संघटिका सौ सुजाता कदम, उपमहानगर संघटिका नवीन पनवेल मंदा जंगले, उपशहर संघटिका नवीन पनवेल सुगंधा शिंदे, उपशहर संघटिका सौ. माया देवडे, विभाग संघटिका सौ. शारदा सुरवसे आणि वैशाली घाग उपस्थित होत्या.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.