नवी मुंबई

ट्रव्हल्स बसमधुन प्रवास करणाऱया दाम्पत्याची 10 लाख 75 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी  

नवी मुंबई  / प्रतिनिधी 

कर्नाटक येथून खाजगी ट्रव्हल्स बसने मुंबईत येणाऱया एका दाम्पत्या जवळचे तब्बल १० लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने सदर ट्रव्हल्स बसमधील सह प्रवाशाने चोरल्याचा प्रकार उघडकिस आले आहे. सीबीडी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील तक्रारदार गौतमचंद लुनावत (५३) हे व्यावसायीक कर्नाटक राज्यातील शिमोगा येथे रहाण्यास असुन जानेवारी महिन्यामध्ये लुनावत यांच्या मुलीचे लग्न असल्याने लुनावत हे सोने खरेदीसाठी पत्नीसह ईस्ट वेस्ट ट्रॅव्हल्सच्या बसने मुंबईला येत होते. यावेळी लुनावत यांच्या पत्नीने सामानाच्या इतर बॅगेसह १३३ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, दोन सोन्याच्याबांगड्या, एक सोन्याचा हार व नाकातील एक नथ सोबत घेऊन ते आपल्या सोबतच्या पर्समध्ये ठेवले हेत. त्यानंतर दोघे सदर खाजगी ट्रव्हल्स बसमध्ये झोपून मुंबईच्या दिशेन येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास बसमधील एका सहप्रवाशांनी लुनावत यांच्या पत्नीजवळ असलेल्या पर्समधील १० लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले.  दरम्यान, सदर बस सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सीबीडी बेलापुर येथे आली असताना, लुनावत यांच्या पत्नीने पर्समधील दागिने तपासले असता, त्यांचे सर्व दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरडा-ओरड सुरु केल्याने बस चालकाने सदर बस त्याच ठिकाणी उभी करुन सदर बस मधील प्रवाशांच्या बॅगेची तपासणी केली. मात्र, कुणाकडेही त्यांचे दागिने सापडले नाहीत. सदर बस मधील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी लुनावत यांनी, त्यावेळी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी सदर बस तेथे थांबवली नाही. सदर बस मुंबईत डोंगरी येथे पोहोचल्यानंतर त्यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार डोंगरी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करुन सदरचा गुन्हा सीबीडी पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.