प्रतिनिधी / पनवेल
सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले आहे. वयाच्य 75 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते. अनाथांची माय लेकरांना अनाथ करून गेली त्यांच्या मायेची ऊब पुन्हा भरून काढता येणार नाही अश्या भावना त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलांनी व्यक्त केली आहे