उरण / विठ्ठल ममताबादे
सध्या कोविड 19 च्या अनुषंगाने ओमिक्रॉन या जीवघेणा विषाणू वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांनी विविध प्रकारचे निर्बंध लावले आहेत. ते रास्त आहे. याबद्दल कोणाचेही दुमत नसावे परंतु सध्या ज्या प्रकारे उरण तालुक्यात एक न्याय व जिल्ह्यातील इतर तालुक्यात वेगळा न्याय हा दुटप्पीपणा का ? सध्या क्रिकेट चा सीजन चालु आहे. तरुणांच्या मध्ये क्रिकेट या खेळाची क्रेज मोठया प्रमाणात आहे. अनेक गावात, विभागात क्रिकेटच्या मानाच्या स्पर्धा भरविण्यात येत असतात परंतु सद्या वेगाने ओमिक्रॉन विषाणू चा प्रभाव वाढत असल्याने प्रशासनाने अनेक जाचक अटी निर्बंध लावले आहेत. परंतु हे फक्त उरण तालुक्यासाठीच का ? या संदर्भात रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनचे सद्स्य तसेच उत्कृष्ट निवेदक राजेंद्र भगत यांनी या संदर्भात रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग कार्यसम्राट अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्याकडे आपल्या उरण तालुक्यातील युवकांची व्यथा मांडली.महागणपती टीम चिरनेर तर्फे त्यांना निवेदनही देण्यात आले.त्यावर महेंद्र घरत यांनी सांगितलं कि लवकरच येत्या एक ते दोन दिवसात DCP साहेबांसोबत मिटिंग घेऊ. आणि त्यावर योग्य तो लवकरच तोडगा काढु असे आश्वासित केले आहे.