पनवेल / प्रतिनिधी
भाऊ आणि बहिणीचे नाते अतूट असे असते. याच नात्याचा उत्सव साजरा करणारा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा दिवस भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक या स्वरुपात साजरा केला जातो. यंदा जगभरात रविवारी म्हणजे ११ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. घरोघरी मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन साजरा होत असतो व भाऊ बहीण एकमेकांना मोठे व महागडे गिफ्ट्स देखील देत असतात मात्र याची जाणीव ठेवूनच पत्रकार मित्र असोसिएशन व आपला आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून आपला आधार फाउंडेशन व पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त पनवेल तालुक्यातील महालुंगी आदिवासी वाडी येथील माता भगिनींना साडी वाटप करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता महालुंगी आदिवासी वाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.