नवी मुंबई

वाशी पोलीस ठाणे अंतर्गत विद्यार्थी व पोलीस यांची जनजागृती रॅली

 
 पनवेल / संजय कदम
वाशी पोलीस ठाणे अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी पोलीस ठाणे हद्दीतील मॉडन स्कूल, सेक्टर 7 येथील विद्यार्थी व पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार यांना घेऊन वाशी पोलीस ठाणे हद्दीत 15 ऑगस्ट 2022 अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थी व पोलिस अमलदार यांच्या हातामध्ये राष्ट्रध्वज देऊन जनजागृती रॅली काढण्यात आली.
                          सदर रॅलीमध्ये ७० ते ८० विद्यार्थी व ५ अधिकारी व २५अंमलदार उपस्थित होते . या रॅलीत सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सहभाग घेऊन  विद्यार्थी व पोलीस यांचा उत्साह वाढविला .
Share This

Leave a Reply

Your email address will not be published.