पनवेल / वार्ताहर
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमिताने करंजाडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील तसेच करंजाडे येथील महिला सहाय्य्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे व राष्ट्रध्वज (झेंडे) विक्री व प्रदर्शनाचे १२ व १३ ऑगस्ट असे दोन दिवसीय आयोजन सेक्टर ४ साकार स्पोर्ट्स मैदान येथे केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामपंचायतीचे सदस्य निर्मला भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे, ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, पोलीस पाटील कुणाल लोंढे, साकार अकॅडमीचे हार्दिक गोखानी यांच्यासह सदस्य, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
कोट-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने करंजाडे येथे महिला बचत गटाचे विक्री व प्रदर्शनाचे आयोजन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यानुसार या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी.
– रामेश्वर आंग्रे – सरपंच,
करंजाडे ग्रामपंचायत
Post Views: 47