नवी मुंबई

सीबीडी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायकल रॅली

 
नवी मुंबई / संजय कदम 
भारतीय स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण भारतात अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन व जनजागृती करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून सीबीडी पोलीस ठाणे येथे आज दिनांक १३/०८/२०२२ रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर सायकल रॅलीमध्ये सीबीडी पोलीस ठाणे मधील १८ अधिकारी व ५० पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला .
सदर सायकल रॅलीस विवेक पानसरे, पोलीस उपयुक्त परिमंडळ १ वाशी , नवी मुंबई  व गजानन राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुर्भे विभाग यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व रॅलीत सहभाग घेऊन प्रोत्साहन दिले.सदर रॅलीचे आयोजन वपोनि अनिल पाटील यांनी केले होते या रॅलीत देशभक्तीपर गीत , देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.  त्याचप्रमाणे सायकल चालवा व आरोग्य वाचवा असा संदेश देण्यात आला. सदर सायकल रॅली ही सीबीडी पोलीस ठाणे  येथून सुरू करून सेक्टर ४, सेक्टर ५ सेक्टर ८, सेक्टर १ पोलीस लाईन, पोलीस आयुक्त कार्यालय समोरून सीबीडी रेल्वे स्टेशन सेक्टर ११, व पुन्हा सीबीडी पोलीस ठाणे येथे येऊन ( साधारणता ७ किलोमीटर ) समाप्त करण्यात आली.
Share This

Leave a Reply

Your email address will not be published.