पनवेल / प्रतिनिधी
तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे,तीन प्रभाग कार्यालये तसेच अहिल्याबाई होळकर भवन , रोज बाजारांच्या निविदा अशी विविध विकास कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक तथा आयुक्त श्री गणेश देशमुख यांनी आज झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकित दिल्या.
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आज(17 ऑगस्ट) आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात झालेल्या बैठकित घेण्यात आला. यावेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आयुक्तांनी संबधित विभागास दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके , उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर,मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखापरिक्षक विनकुमार पाटील, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे,यांच्या सह पालिकेतील सर्व विभांगाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
नागरी प्राथमिकआरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालये बांधणे,महाराणी अहिल्याबाई होळकर भवन, पंतप्रधान आवास योजना ,रोज बाजार निविदा, सिडको कडील भूखंड हस्तांतरीत करणे,मालमत्ता करांची बिले पाठविणे, वाहन खरेदी करणे, चौकांचे सुशोभिकरण करणे अशा विविध विकास कामांचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला. तसेच त्या त्या विभागास कामे गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना दिल्या.