पनवेल

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी घेतले विविध गणेश मंडळात जाऊन गणरायाचे दर्शन

पनवेल / संजय कदम

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळांचे व वैयक्तीक गणपतीचे दर्शन घेतले. गणेश विसर्जन प्रसंगी कोळी बांधवांतर्फे महेश साळुंखे यांचा सामाजीक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला पनवेल व उरण तालुक्यातील अनेक सार्वजनीक मंडळाच्या दहा दिवसांच्या गणपतींना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आवर्जून भेट दिली व त्यावेळी त्यांच्यासोबत सामाजीक कार्यकर्ते राजेश खुटले उपस्थित होते. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याकरिता त्यांनी पनवेल व उरणचा दौरा संपन्न केला. गणेश दर्शनासोबत त्यांनी कार्यकर्त्यांशी विविध विषयावर चर्चा केली. पनवेलमधील मिरची गल्लीचा राजा व तुकारामशेठ दुधे यांच्या गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.