पनवेल / वार्ताहर
पनवेल शहर परिसरातून एक तरुण बेपत्ता झाल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रतिक राजेश गायकवाड, वय २५ वर्षे, उंची ५ फुट ३ इंच, रंग सावळा, चेहरा गोलाकार, नाक पसरट, केस काळे कुरळे, अंगात नेसून पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळया रंगाची जिन्स पॅन्ट, पायात राकाडी काळया रंगाचे सॅन्डल तसेच अॅक्टीव्हा दुचाकी सोबत आहे. त्याला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किंवा पोहवा संदीप नवले यांच्याशी संपर्क साधावा.