पनवेल

चौदाव्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

पनवेल / वार्ताहर

चौदाव्या मजल्यावर काम करीत असलेल्या एका कामगाराचा तोल जाऊन खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नवीन पनवेल परिसरात घडली आहे. नवीन पनवेल येथील प्रजापती ओरनेट या इमारतीच्या  चौदाव्या मजल्यावर खिडकीला मार्बल लावण्याचे काम निमजारू जमीर शेख (वय २६) हा त्याच्या सहकाऱ्यासह काम करीत असताना अचानकपणे त्याचा तोल जाऊन तो खाली पडला त्यात तो जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद खान्देश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.