पनवेल / प्रतिनिधी
शिवसेना दसरा मेळावा करिता बीड जिल्ह्यातून काही शिवसैनिकांची बीड ते शिवतीर्थ मुंबई येथे पायी निष्ठायात्रा आज खारघर येथे आली असता शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. या निष्ठायात्रे मध्ये तालुका प्रमुख बीड उल्हास गिरम, नगरसेवक बीड सुनील अनुभवणे यांच्या सह शंभरहून अधिक शिवसैनिक या यात्रेत सहभागी झाले आहेत. तब्बल १८ दिवसांचा पायी प्रवास पाहता त्यांचा थांबा जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या निवासस्थानी करण्यात आला होता. तसेच आज दिनांक ३ ऑक्टोबर रोजी त्यांची निष्ठायात्रा पुढे पायी चालत खारघर, वाशी, मानखुर्द, चेंबुर सायन मार्गे दादर-मुंबई, छत्रपती शिवाजी पार्क (शिवतीर्थ) कडे रवाना झाली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, उपशहर प्रमुख ललित बुंदेला, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, युवासेना विभाग अधिकारी संदीप खोचरे आदि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.