राजकीय

ठाकरे गटाला मशाल चिन्ह

शिंदे गटाच्या राजकीय नाटका नंतर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह धनुष्य बाण व शिवसेना हे नाव गोठवल आणि ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले. आणि राज्यात विविध ठिकाणी त्याचे पडसाद उमटले  चिन्ह जरी गोठवल गेलेलं असेल तरी आम्हाला मशाल ही निशाणी मिळाली आणि हीच धगधगती मशाल प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात हिंदुत्वाचा, मराठी अस्मितेचा लढा कायम ठेवेल असा आत्मविश्वास शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत साहेब यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर शहर येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे मुळ चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिले आहे. हेच चिन्ह घेऊन पुढील पोट निवडणूक लढवून जिंकून दाखवू.

यावेळी शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दिपक घरत, खारघर शहरप्रमूख गुरुनाथ पाटील, उपशहर प्रमुख नंदू वरुंगसे, प्रशांत जांभूळकर, विभाग प्रमुख मनेश पाटील, अनिल तळवणेकर, उत्तम मोर्बेकर, यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित मोठया संख्येने होते.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.