उरण

देशात समृद्धी आणायची असेल तर घरांतील मातासुरक्षीत असयला हावी – नरसू पाटील

उरण/ प्रतिनिध

या ठिकाणी मला आनंद वाटतो की आजसाई संस्थेच्या वतीने माझ्या माता  भगिनीकरिता माता सुरक्षीत तर घर सूरक्षीत अभियान आयोजित करण्यात आले आहे. खर आहे जिच्याउदरी आपण जन्म घेतो ती सूरक्षीत असली पाहिजे कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीजगा उद्धारी असे म्हटले जाते याचा दाखला इतिहासात पाहण्यास मिळतो आपण सर्वजण अनेकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज्यांचे पुतळे पाहतो आशा थोर पुरुषाच्या मागे खंबीरपणेउभ्या होत्या त्या त्यांच्या  मातोश्रीजिजामाता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करूशकले, म्हणूनच मी म्हणतो की माता सुरक्षीत तर घर सूरक्षीत  म्हणण्यापेक्षा माता सुरक्षीत तर देश सूरक्षीतअसे म्हटले तर ते वावगे ठरणारे नाही असे स्पष्ट मत  साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी व्यक्तकेले.ते उरण येथील साई संस्था संचलित नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्येआरोग्य विभाग रा.जी.प. आयोजित माता सुरक्षीत तर घर सूरक्षीत अभियांतर्गतशिबिराच्या शुभारंभा प्रसंगी आपले मत व्यक्त करताना म्हणाले.  या जगात मते शिवाय काही नाही आई आपल्याला जन्म देते कर्मदेते ती   सूरक्षीत असली पाहिजे तिचे आरोग्य निरोगी असलेपाहिजे  ज्या घरची माता सूरक्षीत असले ते घरसूरक्षीत असेल म्हणून मातांचा सन्मानाचा हा दिवस आहे,या साठीच साई संस्थेच्यावतीने आणि रा.जी.प.आरोग्य विभागाच्या सहकार्याने आजचा उपक्रम हाती घेतला आहे, कारणआमच्या तालुक्यांतील माता,भगिनी जर सूरक्षीत राहतील तरच आमचा तालुका देशतसृदृढबनेल,देशात खरोखरच समृद्धी आणायची असेल तर घरा घरांतील माता सुरक्षीत असयलाहावी असे त्यांनी शेवटी सांगून रा.जी.प.आरोग्य विभागासह डॉ.राजेंद्र इटकरडॉ.बाबासो कालेल,डॉ.स्वाती म्हात्रे, व त्यांच्या टीमचे आभार मानले. नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरोग्यविभाग रा.जी.प. आयोजित माता सुरक्षीत तर घर सूरक्षीत अभियांतर्गत महिला, स्तनदामाता,वकिशोरवयीन  मुलीसाठी विशेष शिबिराचे आयोजनकरण्यात आले होते.या शिबिराचा लाभ परिसरांतील 70पेक्षा अधिक महिलांनी घेतला.यावेळीउपस्थित पुरुषवर्गानेही आपली तपासणी करून घेतली. शिबिरचेउद्घाटन साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरा साठी उरणचे जेष्ठपत्रकार तथा नगराजशेठसीबीएसई इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक प्रदीप पाटील व परिसरांतील महिलामोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या.शिबिरा साठी उरण तालुका आरोग्य विभाग अधिकारी डॉ.राजेंद्रइटकर,इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णाल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बाबासो कालेल,डॉ.स्वातीम्हात्रे,संतोष पगारे,प्राची पाटील.संगीता शिंदे,सुप्रिया पाटील,विलासिनी बोरवेकर यांचेविशेष सहकार्य लाभले. शिबिरा प्रसंगी डॉ.बाबासो कलेलयांनी “माता सूरक्षीत तर घर सूरक्षीत” अभियानाचे कार्य व महत्व विषद करून उपस्थितमहिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.तर उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्रइटकर यांनी उपस्थित महिलाना शासनाच्या आरोग्य विषयीयोजनाची सविस्तरपणे माहितीसांगितली. या तपासणी अंतर्गत रक्तदाब,ब्लड शुगर (मधुमेह), CBC,थायरॉईड फंक्शनलटेस्ट,लिव्हर फंक्शनल टेस्ट( LFT-लिव्हर)लीपीड प्रोफाईल (CHOLESTEROL),रीनलफंक्शनल टेस्ट(RFT-किडनी),आरए फॅक्टर,आदीची तपासणी करण्यात आली व संबंधित आजारावर मोफतऔषधाचे वाटप करण्यात आले. शिबीर यशस्वी करण्या साठी नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनलस्कूलच्या प्रायमरी विभागाच्या प्रिन्सिपॉल इशिका मॅडम.प्री. प्रायमरी विभागाच्याप्रिन्सिपॉल सौ.ज्योती मॅडम. सौ.सुवर्णा शर्मा मॅडम,तेजल पठानिया मॅडम,भार्गवीपाटील मॅडम,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, फोटो:शिबीर

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.