पनवेल

तीन तारखेला प्रवास्यांचा एल्गार…

पनवेल / प्रतिनिधी

गेली 14 वर्षे लाल फितीच्या कारभारात अडकून पडलेल्या पनवेल एसटी स्थानकाच्या प्रकल्प उभारणी करता पनवेल प्रवासी संघाच्या माध्यमातून एल्गार पुकारत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल स्थानकातून प्रवास करणे म्हणजे एक जिगरीचे काम आहे. येथील कर्मचारी वर्ग देखील जीव मुठीत घेऊन मोडकळीस आलेल्या इमारतीत काम करत आहे. कोकण आणि मुंबई विभागांना जोडणारे अत्यंत महत्त्वाचे स्थानक जर दुर्लक्षित असेल तर बाकी स्थानकांच्या बाबतीत विचार करणे देखील दुरापास्त होईल.
बांधा व हस्तांतरित करा या धर्तीवरती महाराष्ट्रात पाच स्थानके प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी निवडले गेले आहेत. त्यामध्ये पनवेल स्थानकाचा समावेश झालेला आहे. दुर्दैवाने त्यानंतर मात्र काम तसूभर देखील पुढे सरकलेले नाही. सदरचे काम मार्गी लागण्यासाठी पनवेल प्रवासी संघाच्या माध्यमातून येत्या 3 नोव्हेंबर 2022 रोजी लाक्षणिक उपोषणाचे संविधानिक हत्यार उपसले आहे. पनवेलचा विकास होतोय असे सांगून सत्ताधारी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील राज्य परिवहन मंडळाच्या एस टी स्थानकाची दुरवस्था झाली असून. एका बाजूला ३०० कोटीची महानगर पालिका , वडाळे तलावाचे सुशोभीकरण, करणारे आमदार एसटी स्थानका साठी प्रयत्न करतील का पनवेल कर जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी तर महानगरपालिकेचे टेंडर भरण्यात मग्न आहे. पनवेल कर जनतेची दिशाभूल करणारे प्रतिनिधी विकासाची भाषा करतात एवढच नव्हे तर तरुणांना रोजगार, विद्यार्थ्याना चांगले शिक्षण देतो असे सांगणारे सरकार मधील आमदार साहेब यांना माहिती नसावे कदाचित नोकरीला व शाळा, महाविद्यालयात एसटी ने प्रवास करावा लागतो आणि त्याच स्थानकाची दूर अवस्था आहे आणि आमदार साहेब गप्प पनवेलकर जनता आता याचा जाब विचारणार येत्या ३ तारखेला पनवेल प्रवाशी संघ जाहीर धरणे आंदोलन करून तर बघताय काय सामील व्हा, एक हाक प्रवाशांच्या सेवेसाठी

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.