पनवेल

प्रवाशी संघाचा एल्गार यशस्वी

पनवेल / प्रतिनिधी

एक हाक प्रवाशांच्या सेवेसाठी असे म्हणत पनवेल प्रवासी संघाने एसटी स्थानकातील संकुलाच्या रखडलेल्या कामास त्वरित सुरुवात करावी या मुख्य मागणीसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. प्रवासी, सेवाभावी संघटना, आणि बहुतांश राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी झाले एसटी स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी मागणी करण्यात आली. आंदोलनाची दखल घेत एसटी प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंते व विभागीय अभियंते यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि आगामी १५ दिवसात प्रकल्पास प्रारंभ करण्यासंदर्भात प्रशासनासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. येणाऱ्या तीस दिवसात कामाला सुरवात नाही झाली तर पुढील आंदोलन मुंबई द्रुतगती मार्ग बंद करू असा इशारा देण्यात आला.
पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्ती कुमार दवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या देखरेखी खाली आंदोलनाचे नियोजन करण्यात आले..२००९ साली राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल स्थानकातील मुख्य इमारत धोकादायक असल्याचा ठपका ठेवत पाडण्यात आली. त्यानंतर बांधा व हस्तांतरित करा या धर्तीवरती उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पाच स्थानकांमध्ये पनवेल स्थानकाची निवड केली गेली.२०१८ साली या प्रकल्पाकरिता मान्यता प्राप्त झाली. परंतु जुने संकुल पाडल्यानंतर 14 वर्षे उलटून गेली आहेत पण अद्यापही प्रत्यक्ष कामास सुरुवात नाही.पनवेलचे स्थानिक आमदार सत्तेत असून त्यांच्या उदासीन कार्यामुळे पनवेलचे बस स्थानक अखेरचे घटका मोजत आहे. कार्यसम्राट आमदार असलेले प्रशांत ठाकूर ह्यात लक्ष देतील का असा सवाल पनवेलकर जनता विचारात आहे. प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ भक्ती कुमार दवे, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील, उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, सचिव श्रीकांत बापट, निलेश जोशी हे आंदोलन स्थळी धरणे देण्यासाठी स्थानापन्न झाले होते.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.